loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोडी लिपी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) - येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष खासदार विनोद तावडे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त "मोडी लिपी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन" सोमवार दिनांक २० व मंगळवार दिनांक २१ जुलै रोजी करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक २० रोजी सकाळी १० वा. संस्थेचे पदाधिकारी व महाराष्ट्र शासन, पुराभिलेख संचालनालयाचे गणेशकुमार वि. खोडके (सहाय्यक संचालक, कोल्हापूर पुरालेखागार), विक्रम म. ठमके (संशोधन सहाय्यक, पुणे पुरालेखागार) हे अधिकारी आणि रोहित मा. जाधव, रोहित अ. खोले व सतिश यादव हे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या मोडी लिपी कागदपत्रांच्या प्रदर्शनाचा लाभ वैभववाडीसह जिल्ह्यातील नागरिकांना घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण व इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन पाटील यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg