राजापूर (प्रतिनिधी) - पर्यटन संचालनालय विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सुरू असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या बांधकामाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलीफे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी काम सुरु असतानाच काही भाग खचल्याचे व निकृष्ट दर्जाचे दिसून आले. संबंधितांकडून झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देणेत आले.
राजापूर शहराच्या मध्यवर्ती विभागामध्ये प्राचीन ब्रिटिशकालीन वखारीचे जागी शिवसृष्टीसारख्या महत्त्वाचा प्रकल्प उभारण्याचे काम पर्यटन संचालनालया मार्फत सुरू असुन शासनाकडून त्याचेसाठी १ कोटी रु. अनुदान मंजूर झालेले आहे. पाहणीदरम्यान बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदाराविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला देऊन या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी तसेच पर्यटन संचालनालय विभागाकडे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्निल पड्यार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.