loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी श्री विठ्ठल मंदिर येथे विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताहाचा शुभारंभ

सावंतवाडी : येथील श्री विठ्ठल मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही १६ जुलैपासून २३ जुलै पर्यंत ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला असून आजपासून त्याचा प्रारंभ झाला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विविध भजनी मंडळे, कीर्तनकार आणि संगीतप्रेमी सहभागी झालेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजन, तर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वारकरी भजन, कीर्तन आणि संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सावंतवाडीसह बांदा, वेंगुर्ले परिसरातील विविध भजनी मंडळे आणि कलाकार आपली सेवा सादर करणार आहेत. शनिवार दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा तसेच सायंकाळी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच दि. २३ जुलै रोजी सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार आहे. या संपूर्ण सप्ताहात भक्तांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन घेऊन हरिनामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन विठ्ठल मंदिर स्थानिक देवस्थान समिती व विठ्ठल मंदिर उत्सव समिती यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg