खेड - खेड येथील ‘शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे’ सिद्धयोग विधी महाविद्यालय, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, ग्रामपंचायतमध्ये जाऊन विविध महत्त्वाच्या कायदेविषयक व्याख्याने देऊन समाज जनजागृतीचे महान कार्य करीत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसण्यास मदत झाली आहे, याचेच प्रत्यय म्हणजे नुकतेच त्यांच्या दायित्व उपक्रमाचे प्रमुख ऍड. दिलीप शां. चव्हाण यांनी खारी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत जाऊन एका दिवशीय पूर्ण वेळ शैक्षणिक कार्यशाळा घेऊन सर्वप्रथम ‘बाल लैंगिक कायदा’ विषयक विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती समजावून सांगितली.
त्यातच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा हेही विषद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा, व्यक्तिमत्व विकास आणि शाळेतील व बाहेरील शिस्त याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले असता, विद्यार्थ्यांचे चेहरे प्रसन्नतेने फुललेले दिसले. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडत होता. त्यास्तव सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे दायित्व उपक्रम हे समाजप्रती शैक्षणिक दृष्ट्या प्रशांसनीय आहे, असे प्रतिपादन खारी जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदेश कदम यांनी ऍड. दिलीप चव्हाण यांचा सत्कार करताना केले.
सिद्धयोग लॉ कॉलेजच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे या स्वतः, विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्फत एक ना अनेक कल्याणकारी उपक्रम सातत्याने ठिकठिकाणी राबवत असतात. त्यात दिलीप चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असतो, असेही ते पुढे म्हणाले. खारी जि. प शाळेचे विध्यार्थी अर्णव बहुतुले, आराध्या बेसावडे, अतुल बहुतुले आणि आरोही पालकर यांनी शेवटी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षिका शकुंतला पुजारी यांनी असे कार्यक्रम प्रत्येक जि.प. शाळेत होणे काळाची गरज आहे असे सांगितले व सिद्धयोग कॉलेजच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे आणि त्यांच्या दायित्व उपक्रम प्रमुख ऍड. दिलीप चव्हाण यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले, सरते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.