loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री , एसटीची भाड्येवाढ

मुंबई : मोठी बातमी समोर आली आहे , ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे . वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये केलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या भाडेवाढीमुळे यापुर्वी केलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होणार आहे. एसटीची ही दरवाढ आज १७ जुलै २०२६ च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी महामंडळाच्या आर्थिक आधारासह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg