loader
Breaking News
Breaking News
Foto

३३ भारतीय पर्यटकांना नेणारी बोट व्हिएतनाममध्ये उलटली

हनोई, : परदेशात फिरायला गेलेल्या भारतीय पर्यटकांबाबत एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ‘फू क्वोक आयलंड’ जवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक टूरिस्ट बोट समुद्रात उलटली आहे. या बोटीमध्ये एकूण ३३ भारतीय प्रवासी प्रवास करत होते. खराब वातावरण आणि समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे हा भीषण अपघात झाल्याचे स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या अपघातात काहींचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच व्हिएतनामच्या स्थानिक प्रशासनाने आणि रेस्क्यू टीमने समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. पाण्यात बुडणार्‍या अनेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अजूनही काही प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भीषण अपघातानंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावास पूर्णपणे अलर्ट मोडवर आला आहे. प्रभावित भारतीय नागरिकांची अचूक संख्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी भारतीय अधिकारी सतत व्हिएतनामच्या स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

टाईम्स स्पेशल

या अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत व माहिती देण्यासाठी व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे भारताच्या दूतावासाकडून विशेष कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने मदतीसाठी अधिकृत हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत. भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं आहे की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आणि चौकशीसाठी २४ तास उपलब्ध आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg