loader
Breaking News
Breaking News
Foto

वादळग्रस्त अनिल परब यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेकडून मदतीचा हात

पोईप, (वार्ताहर ) : मालवण तालुक्यातील मालोंड-बेलाचीवाडी येथील अनिल राघो परब यांच्या घरावर नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सागाचे मोठे झाड कोसळून घराचे छप्पर पूर्णपणे उध्वस्त झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना मालवण तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र ऊर्फ बाबू परब यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत घरावर पडलेले झाड हटवून कुटुंबाला तातडीचा दिलासा दिला. या घटनेची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुका प्रमुख विनायक बाईत यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी स्वखर्चातून घराच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. लवकरच घराचे छप्पर पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकसानग्रस्त अनिल राघो परब यांना छप्पर दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य सुपूर्द करताना पंचायत समिती सदस्य तथा गटनेते संजय ऊर्फ छोटू ठाकूर, विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, प्रवक्ते निलेश बाईत, विभागीय सचिव मंगेश यादव, अल्पसंख्याक मसुरे विभागप्रमुख इस्माईल शेख, तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र परब, मालोंड-बेलाचीवाडीचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, माजी सरपंच हेमंत पारकर, माजी उपसरपंच नाना परब, माजी सरपंच सुभाष परब, संदीप परब, दिलीप परब, स्वप्नील दळवी तसेच घरमालक अनिल परब उपस्थित होते. या मदतकार्याला शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg