loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड भडगाव गणात राष्ट्रवादीला मोठा धक्का; कुलदीप पवार यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील भडगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच भडगाव पंचायत समिती गणाचे माजी उमेदवार कुलदीप पवार यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जामगे येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी रामदासभाई कदम यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, "शिवसेना ही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी सातत्याने कार्य करणारी संघटना आहे. पक्षात दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता भासू देणार नाही आणि प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी शिवसेना कटिबद्ध राहील."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच कार्यक्रमात कुलदीप पवार यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवत त्यांची शिवसेना भडगाव गण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. रामदासभाई कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे भडगाव परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी गती मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कुलदीप पवार यांच्यासोबत मंदार महाडिक, कुमार लाले, शुभम बोथरे, दिपेश तांबे, जितेंद्र गावडे, रमेश बोथरे, संतोष शिगवण, सुनील बोथरे, उमेश जोगळे, राकेश जोगळे, रविंद्र बोथरे, मनोज सकपाळ, संतोष बैकर, सचिन जोगळे, आसिफ पेडेकर, सुदेश धोत्रे, मिलिंद शिगवण, मंगेश पवार, दिनेश चोरगे, गणेश बोथरे आणि भाई घाणेकर यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षावर विश्वास व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भडगाव परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भडगाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात असून, भडगाव गणात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होण्यास या पक्षप्रवेशाची मोठी मदत होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg