loader
Breaking News
Breaking News
Foto

दीर्घ आजार असलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; संगमेश्वर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

संगमेश्वर(प्रतिनिधी)- संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर येथील साळवीचाडी येथील ५१ वर्षीय विकास दत्ताराम साळवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस माहितीनुसार, वैदेही विकास साळवी (वय ४२)यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विकास साळवी हे गेल्या सहा महिन्यांपासून आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबई येथील डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. १५ जुलै रोजी घरी असताना त्यांना ताप आल्याने घरगुती उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने १६ जुलै रोजी सकाळी त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

टाइम्स स्पेशल

या घटनेची नोंद १६ जुलै रोजी दुपारी १.३६ वाजता करण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार व्ही. व्ही. मनवल हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg