loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा अपघातातील चारही जण नागपाडा मुंबईचे

केळंबे-लाजा (सिराज नेवरेकर) - गोव्याहून मुंबईकडे जाणारी क्रेटा कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक बसल्यामुळे क्रेटा गाडीतील चार जण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची भीषणता एवढी होती की कारचा चक्काचूर झाला. अपघात लांजा रेस्टहाऊस शांतीनगर येथे झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून मुबईकडे जाणारी क्रेटा कार (एमएच ०१८०२१) रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला एमएच ०५ ईआय ३८७७ या वाहनाला पाठीमागून जोरदार धडकली आणि क्रेटा गाडीतील यास्मिन इरफान कुरेशी वय ५४, पिझ्झा अनस कुरेशी वय २७ वर्ष, महम्मद इरफान कुरेशी वय १५वर्ष तीनही रहाणार बेलासिस रोड नागपाडा जंक्शन मुंबई, मुस्तफा अल्फाज काफी वय २४ वर्ष हे चार जण जागीच मृत झाले असून अनस इरफान कुरेशी (वय ३१ वर्ष) रहाणार बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई यांना गंभीर दुखापत झाली आहे.

टाईम्स स्पेशल

अपघाताची माहीती मिळताच पोलीस, महामार्ग प्रशासन, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक खोळंबा होऊ नये म्हणून पोलीस आणि प्रशासनाने वहातूक सुरळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करून पंचनामा व पुढील तपास सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg