मालवण (प्रतिनिधी) - दैनिक रत्नागिरी टाइम्सचे देवगड तालुका प्रतिनिधी, देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांचे सोमवारी १३ जुलै रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरांतील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
दयानंद मांगले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांचा स्वभाव मनमिळावू, दिलदार आणि सर्वांना आपलेसे करणारा असल्याने त्यांनी समाजात मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, पुतणी, पुतण्या तसेच आप्तस्वकीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने देवगड तालुक्याने एक संवेदनशील, अभ्यासू आणि दिलदार पत्रकार गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
दिलदार मित्र हरपला अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दयानंद मांगले यांच्या निधनाने देवगडच्या पत्रकारिता क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नसल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृतींना सर्व स्तरातून विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.