आबलोली(संदेश कदम)ः-पर्यावरण समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेला हिरवेगार करण्यासाठी सध्या संपूर्ण देशात एक मोठी चळवळ राबवली जात आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून दि. ५ जुलै ते १९ जुलै संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात वृक्षारोपण अभियान सुरू झाले असून, आजच्या आठव्या दिवशीपर्यंत १ लाख २० हजाराहून अधिक वृक्ष लागवड पूर्ण झाली आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने आज १३ जुलै २०२६ रोजी खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहने ऐनवली कार्यक्षेत्रामध्ये एकाच दिवशी तब्बल १००० वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच रामानंद सांप्रदाय तालुका सेवा समिती खेड यांच्या वतीने ही लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनवेळी खेड तालुका पंचायत समिती सभापती आफिया पालेकर तसेच माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते वैभव खेडेकर, पं.समिती सदस्य निसार जाफर सुर्वे, पं.समिती सदस्य महेंद्र भोसले, समीक्षा म्हादे, पं.समिती कृषी विस्तार अधिकारी अनिकेत अनिल लोहार, सुनील यशवंतराव गावडे, ऐनवली ग्रामविकास अधिकारी अश्विनी झुंबडे, खेड तालुका खरेदी विक्री संघ संचालक विष्णू मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर मोरे स्कूल कमिटी चेअरमन संतोष मोरे, नवयुग क्रीडा मंडळ अध्यक्ष सुमित चिकणे, रुपेश मोरे, शशिकांत मोरे, दिलीप साबळे, रामानंद संप्रदायाचे पीठ ब्लड कॅम्प प्रमुख- दत्तात्रय मोरे, विलास बेंद्रे, जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, पत्रकार मंगेश उर्फ भाई तावडे, सौरभ चालके, तालुकाध्यक्ष दगडू नवरे, महिला अध्यक्ष प्रज्ञा खेडेकर आदी. मान्यवरांसह रामानंद संप्रदायाचे सर्व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.