loader
Breaking News
Breaking News
Foto

वाकेड येथील पेट्रोल पंपाच्या केबिनवर दरड कोसळल्याच्या घटनेत वेडसर अनोळखी व्यक्तीला प्राण गमवावे लागले

लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा महामार्गावरील तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग नजीकच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या केबिनवर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका ५० ते ५५ वर्षीय वेडसर अनोळखी व्यक्तीचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसात तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या वेडसर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेले आठवडाभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. पावसाची संततधार सुरूच असल्याने या पडझडीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना शनिवारी ४ जुलै रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील वाकेड लक्ष्मीबाग येथे घडली. याठिकाणी सुरू असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या कामाच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असलेल्या डोंगरातील दगड मातीयुक्त दरड अचानक या पेट्रोल पंपाच्या आवारातील एका केबिनवर कोसळली आणि क्षणार्धात ही केबिन मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. सुदैवाने या दुर्घटनेत याठिकाणी कामाला असणारे जेद अतिकुल त्यागी (१८ वर्षे, रा. उत्तरप्रदेश), सुवेल अयुब त्यागी (१९ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) व महंमद समीन साहवेज (२२ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) हे तीन परप्रांतीय कामगार बालंबाल बचावले आहेत. मात्र या दुर्घटनेत एका वेडसर अनोळखी व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg