loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळ वीज प्रकल्पावरील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवर जप्तीची कारवाई होणार! : सरपंच सोनल मोरे

वेळणेश्वर उमेश शिंदे /रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जमीन व इमारत कराच्या थकबाकीवरून अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींनी रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात थेट जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीसह जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनालाही अधिकृत नोटीस देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

2019 पासून rgppl कंपनीने अंजनवेल ग्रामपंचायत,रानवी ग्रामपंचायत व वेलदूर ग्रामपंचायत यातील कोणत्याही ग्रामपंचायतिला एक रुपया कर भरलेला नाही यासंबंधी वारंवार कंपनीकडे कराची मागणी करून सुद्धा कंपनीने कराची रक्कम न भरल्यामुळे हे कारवाई आम्ही करत आहोत .. तीन ग्रामपंचायत मिळून कराची रक्कम साधारण चार कोटी पेक्षा जास्त असून या रकमे अभावी तीनही गावांमध्ये होणारी विकास कामे ही मागील कित्येक वर्षापासून स्थगित आहेत त्यामुळे या संदर्भात ग्रामपंचायत अधिनियमानुसार आम्ही सदर कंपनीला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीची नोटीस बजावली आहे ..

टाइम्स स्पेशल

दरम्यान, या प्रस्तावित जप्तीच्या कारवाईवर कंपनीची भूमिका काय असेल आणि २८ जुलैपूर्वी तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg