loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा खेमराज 10 वी 91 च्या बॅचतर्फे आरोस दांडेली दिव्यांग शाळेस मदत

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या 1991 च्या दहावी बॅचच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वर्गाने आपल्या गेटटुगेदर कार्यक्रमांनतर शिल्लक राहिलेल्या रक्कमेत भर टाकून 21 हजार रुपयांची देणगी आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ संचलित कर्णबधिर तथा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेस प्रदान केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांदा खेमराज प्रशालेच्या दहावीच्या 1990-91 वर्गातर्फे वेळोवेळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो. अशा स्नेहमेळाव्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो. या कार्यक्रमानंतर उरलेल्या 10,500 रुपये रकमेत या वर्गाचे सदस्य शंकर विजय सावंत यांनी आपले वैयक्तिक 10,500 भरीस घातले आणि एकुण 21,000 ची देणगी या सेवाभावी संस्थेला देण्यात आली. तसेच तांदुळ, तेल, पीठ, खाऊ आदी साहित्यही देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

91 बॅचच्या वतीने राजाराम सावंत, वर्षा नाडकर्णी, शंकर सावंत, प्रशांत महाडेश्वर, मुनिरा मुजावर, अजित मयेकर, आशुतोष भांगले यांनी कोंडुरा येथे शाळेत जाऊन ही मदत प्रदान केली. शाळेने तसेच विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी बॅच सदस्य तथा तलाठी वर्षा नाडकर्णी, शंकर सावंत, आशुतोष भांगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी तेथील कामकाजाची, वर्गखोल्यांची, शिक्षण पद्धतीची तसेच नव्या इमारतीच्या कामाची पाहणी केली व संस्थेच्या समस्याही जाणून घेतल्या. शाळेचे शिक्षक व कर्मचारीवृंद यांनी बांदा खेमराज 10 वी 91 बॅचचे आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg