loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक चंद्रकांत राजाराम बेलेकर यांचा गुहागर तालुक्यातील शिक्षक मित्रपरिवार यांच्यावतीने सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - जिल्हा परिषद रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने गुहागर तालुक्यातील जानवळे शाळा नं.१ चे शिक्षक चंद्रकांत राजाराम बेलेकर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने गुहागर तालुका शिक्षक मित्रपरिवार यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. शृंगारतळी येथील श्री संत शिरोमणी गोरा कुंभार सभागृह येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील आदर्श शाळा, नवनियुक्त केंद्रीय प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक पतपेढी गुहागर तालुका संचालक अरविंद पालकर, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे जिल्हा संचालक चंद्रकांत झगडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, जानवळे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माजी संदीप कोंडविलकर, शिक्षक नेते विश्वास बेलवलकर, माजी मुख्याध्यापक कैलास शार्दुल, प्रेमा बेलेकर, समीर पावसकर, बाळासाहेब बेलेकर, नंदिनी बेलेकर, सुखदेव साळुंखे, शोभा साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते महेश तांबे, महेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पावसकर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg