मालवण (प्रतिनिधी) - देवबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये समायोजनमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकास याच शाळेत कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी आज देवबागचे सरपंच उल्हास तांडेल आणि स्थानिक पालकांनी मालवण पंचायत समितीमध्ये धडक दिली. गेली दोन वर्षे आम्ही शिक्षण विभागाला सहकार्य केले, मात्र आता नियुक्त झालेल्या शिक्षकाला कोणत्याही परिस्थितीत प्रशालेतून हलवू देणार नाही, याबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असा आक्रमक इशारा यावेळी पालकांनी दिला. देवबाग येथील पालकांनी मालवण पंचायत समितीत धडक देत आपली भूमिका मांडली. यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय माने, देवबागचे सरपंच उल्हास तांडेल आणि सहदेव साळगावकर यांच्यासह देवबाग येथील पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत पालकांनी वस्तुस्थिती मांडली. देवबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये गतवर्षी पहिली ते सातवीच्या वर्गांसाठी शाळेत शिक्षक उपलब्ध नव्हता. दोन वर्षे केवळ एका शिक्षकावर शाळेचा गाडा सुरू होता, तरीही ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला पूर्ण सहकार्य केले. आता कुठे कार्यालयीन आदेशान्वये पदवीधर शिक्षकाची येथे नियुक्ती झाली आहे. ते रुजू झाल्यापासून अत्यंत उत्तम प्रकारे अध्यापनाचे काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला अधिकारी फोन कशासाठी करत आहेत? हे कितपत योग्य आहे?" असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या भावनेला पाठिंबा देत सरपंच उल्हास तांडेल यांनीही प्रशासनाला खडसावले. संबंधित शिक्षकाची रितसर प्रशासकीय आदेशाने नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे या निर्णयात आता कोणताही बदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आम्ही खपवून घेणार नाही, यात आता कोणतीही तडजोड होणार नाही, असे सरपंच तांडेल यांनी स्पष्ट केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनही सादर केले. देवबाग नं. १ या शाळेला मोठा इतिहास आहे. विद्यार्थ्यांचे हित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लक्षात घेता पदवीधर शिक्षकाची नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी. जर राजकीय किंवा प्रशासकीय दबावापोटी या शिक्षकाची इथून उचलबांगडी करण्याचा प्रयत्न झाला, तर देवबागवासीय तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.