loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळंबे येथील भूस्खलनाची बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द होताच प्रशासनाकडून पाहणी व पुढील कार्यवाहिचे आश्वासन

शास्त्रीपुल (वहाब दळवी )संगमेश्वर तालुक्यातील कमळाजा बाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळंबे येथील हायस्कूलची नवीन इमारत बांधण्यात आली ती इमारत अखेर दि.९-६-२०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात सील करण्यात आली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नवीन इमारतीच्या मागील बाजूस मोठे भूस्खलन झाल्याने शाळेच्या इमारतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच या शाळेत ४०० विदयार्थी शिक्षण घेत आहेत. या विदयार्थी साठी शाळेच्या नवीन इमारतीच्या मागील बाजूस शौचालय बांधण्यात आले असून हे शौचालय भूस्खलनामुळे पूर्णपणे धोका-दायक झाले आहे. पावसाळा सुरू होऊन आठ ते दहा दिवसच झाले असून या पुढे आणखी तिन चार महिने पाऊस पडणार असून या पावसात आणखी दरड कोसळल्यास संपूर्ण इमारतीला व शौचालयाला मोठा धोका निर्माण होणार आहे. महामार्गाच्या कामात संबंधित ठेकेदाराने आवश्यक सरक्षानात्मक उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दैनिक रत्नागिरी टाइम्स वूवृत्ताची दखल घेत संगमेश्वरच्या पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी तात्काळ घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षन विभाग, शासकीय अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनेची तातडीची बैठक बुधवारी कोळंबे हायस्कुल मध्ये घेऊन जागेचे पंचनामे तयार करण्यास सांगितले या बैठकीला पंचायत समिती सदस्य सुहास मयंगडे, विजय परीट गट शिक्षण अधिकारी, नायब तहसीलदार गिरी, अमर चाळके, संस्थेचे चेअरमन श्री. नयन मुळ्ये, संचालक मंडळ, जे. एम. म्हात्रे कंपनीचे इंजिनियर, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आतिष पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg