loader
Breaking News
Breaking News
Foto

अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर पडलेले भरले खड्डे

पनवेल : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डेरवली ते पळस्पे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठा त्रास होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार साबळे तसेच पोलीस अंमलदार भोळे यांनी केवळ वाहतूक नियमन करण्यापुरते मर्यादित न राहता, स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले. मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी त्यांनी केलेले हे लोकाभिमुख कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"जनतेची सेवा हीच खरी कर्तव्यपूर्ती" या भावनेतून केलेल्या या उपक्रमामुळे अनेक वाहनचालकांना दिलासा मिळाला असून, पनवेल शहर वाहतूक शाखेच्या जनहिताच्या बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस हवालदार साबळे व पोलीस अंमलदार भोळे यांचेवर कौतुकाचा वर्षावं होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg