loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सावंतवाडी : महाराष्ट्राचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मतदारसंघात साजरा झाला. कुटुंबियांकडून देखील मुंबई येथे केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राज्यातील राजकीय नेतेमंडळीकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, आमदार निलेश राणे आदींसह राज्यातील नेतेमंडळीकडून केसरकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाध्यक्षा अँड निता कविटकर सावंत यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

तसेच कुटुंबियांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्नी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जून आदी कुटुंबिय उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg