loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

देवळे (प्रकाश चाळके) - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तसेच हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, पॅकेज-७ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम लांजा येथे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून राष्ट्रीय महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यास परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा कोकणाच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा असून या महामार्गामुळे वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामुळे प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळणार असून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण उपक्रमाचे स्वागत करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार किरण सामंत यांनी विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत हरित कोकण घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

वृक्षारोपण कार्यक्रमामुळे परिसरात पर्यावरण जनजागृतीचा संदेश पोहोचला असून नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा सभापती मानसी आंबेकर, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता कुलकर्णी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठक बगळे, नायब तहसीलदार गोसावी, ईगल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रेम, तसेच सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य जि.प सदस्य व पर्यावरणप्रेमी लांजावासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg