loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

वेळणेश्वर (उमेश शिंदे)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या वाढदिवसानिमित्त, ‘भारतीय जनता पार्टी युवा मोचा’र्, गुहागर तालुका आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ‘रविंद्र चव्हाण’ यांच्या सुचनेनुसार संपूर्ण राज्यात रक्तदान शिबीर होत आहेत. गुहागर तालुक्याचे हे रक्तदान शिबिर गुहागर ग्रामीण रूग्णालयाच्या मागील इमारतीमध्ये पार पडले. या रक्तदान शिबिराची सुरुवात भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस, उपसभापती निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अजित साळवी, नगराध्यक्षा निता मालप, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाडेकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, स्नेहा शिगवण, मानसी रांगळे, महिला तालुकाध्यक्ष प्रांजल कचरेकर, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, उमेश भोसले, संगम मोरे, विनायक सुर्वे, आशिष विचारे, विजय मसुरकर, सर्व नगरसेवक आदींसह भाजपचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

रक्त संकलन रक्तकेंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रत्नागिरीकडून करण्यात आली. डॉ. अजयराज पवार, डॉ. लोकेश निंबोरे, भारती भोसले, जयश्री कुंडलकर, जागृती देशमुख, धनश्री पानवलकर, साईदिप बारगोडे, संदिप वाडे यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीरात ८५ जणांची तपासणी करण्यात आली. प्रत्यक्ष ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भाजपा युवा मोर्चा गुहागर आयोजित या रक्तदान शिबीराला शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राजेश बेंडल, सभापती प्रणव पोळेकर, तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल, अमरदिप परचुरे यांनी भेट देऊन या सामाजिक आरोग्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg