loader
Breaking News
Breaking News
Foto

हरिहरेश्वरच्या MTDC बीचवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह , महाड परिसरातून वाहत आला असावा ?

श्रीवर्धन ( संदेश घोलप ) रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हरिहरेश्वर येथील एमटीडीसी (MTDC) बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात आणि वादळात हा मृतदेह महाड परिसराकडून वाहून आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर येथील एमटीडीसी रिसॉर्ट जवळील समुद्रकिनाऱ्यावर आज एक मृतदेह किनाऱ्यालगत स्थानिक नागरिकांना दिसून आला. किनाऱ्यावर मृतदेह पाहताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती श्रीवर्धन पोलिसांना दिली. माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह समुद्राबाहेर काढला आणि त्याचा पंचनामा केला.

टाइम्स स्पेशल

गेल्या आठवड्यात संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाड परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. महाड येथील सावित्री नदीचे पाणी थेट समुद्राला मिळत असल्याने, या मुसळधार पावसात आणि वादळात महाड परिसरातून नदीपात्राद्वारे हा मृतदेह वाहून थेट हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg