loader
Breaking News
Breaking News
Foto

संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं ,सरकारने चर्चेस बोलावले

नवी दिल्ली :देशभरातून हजारो युवा राजधानी दिल्ली झाले आहेत, आज सकाळपासूनच कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले आहे आणि चोहीकडे राजधानी दिल्लीतही सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले. मोठा बंदोबस्त सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला. कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचले आहेत. संसद भवन परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसद भवनाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. या आंदोलक आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. आंदोलक रेल्वे भवनजवळ धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी दाखल झाल्याचे समोर आले आहे.

टाइम्स स्पेशल

संसद भवनात धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांची भेट सुरू आहे. CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे, सरकारनेही CJP नेत्यांना भेटीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीतर्फे आशुतोष रांका आणि सौरभ दास हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg