loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला लांजा बौद्धजन मंडळाचा पाठींबा.

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दिल्ली जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई/ग्रामीण मंडळाच्यावतीने पाठींबा देण्यात आला. शुक्रवारी लांजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोल यांनी स्वीकारले. यावेळी मोठया संख्येने लांजा तालुक्यातील बौद्धसमाज बांधव उपस्थित होते. देण्यात आलेल्या निवेदनात बौध्द समाजाच्यावतीने म्हटले आहे की, सोनम वांगचुक हे गेले १९ दिवस दिल्ली जंतर-मंतर या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या नीट व अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये अनेकवेळा पेपर फुटी झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या अतोनात मेहनतीवर पाणी पडले आहे. सततच्या या प्रकाराला जबाबदार म्हणून केंद्र सरकारचे शिक्षणमंत्री प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन आपल्या पदाचा राजिनामा द्यावा. यासाठी वांगचुक उपोषणाला बसले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा तहसीलदार प्रियांका ढोल यांना निवेदन देताना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देवधेकर, अनिरुद्ध कांबळे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष लहू कांबळे, सरचिटणीस सचिन जाधव, भिकाजी देवधेकर, सल्लागार प्रभाकर कांबळे, अनोज कांबळे, गौतम कांबळे, अशोक कांबळे, हनुमंत कदम, आर बी कदम, शिवाजी कांबळे, सकपाळ, प्रशांत कदम, एस. एम. कांबळे, विलास कोटकर यासह बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg