loader
Breaking News
Breaking News
Foto

लेखक, कवी आपल्या भेटीला’ उपक्रम; पीएमश्री ई-ग्रंथालयाचे उद्घाटन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील एकमेव पीएमश्री मानांकन प्राप्त वेळणेश्वर नं. १ प्रशालेत पीएमश्री हरित शाळा उपक्रमांतर्गत ‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘प्रसिद्ध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान (Expert Talk)’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी आणि साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची अनोखी संधी मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद व ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागरचे अध्यक्ष तसेच इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट असलेले ज्येष्ठ कवी राजेंद्र आरेकर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा आरेकर यांचीही उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लेखिका व कीर्तनकार प्रा. मनाली बावधनकर, ग्रंथपाल सोनाली घाडे, कवी ज्ञानेश्वर झगडे, कादंबरीकार ईश्वर हलगरे, शिघ्रकवी सुधाकर कांबळे तसेच लेखक व बालभारती सदस्य डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत साहित्यनिर्मिती, वाचन संस्कृती, भाषा संवर्धन आणि सर्जनशील लेखनाचे महत्त्व सांगितले. याच कार्यक्रमात कवी राजेंद्र आरेकर यांच्या हस्ते पीएमश्री ई-ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ई-ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना डिजिटल पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होणार असून उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, समिती सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतीश नलावडे, शिक्षक बिपिन विचारे, शैलजा साळे, बाबासाहेब राशिनकर, सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर-वावरे, प्रियांका पवार, अंजूम शेख, तेजस्विनी जगताप, आकांक्षा खरे आणि साक्षी खरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, वाचन आणि सर्जनशील विचारांची आवड निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg