loader
Breaking News
Breaking News
Foto

यंदा गणेशोत्सवात मुंबईच्या चाकरमान्यांचा प्रवास सुसाट होणार , चार तासात गावात घरी जेवायला येणार

रत्नागिरी टाइम्स डेस्क : यंदा गणेशोत्सवात मुंबईच्या चाकरमान्यांना जलद गतीने कोकणातील घरी येता येईल अशी स्थिती असून मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव दरम्यान अर्धवट काम मार्गस्थ होत असल्याने आता प्रवास सुसाट होणार आहे, मुंबईत सकाळी चहा पिऊन दुपारी जेवायला घरी असा हा प्रवास ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई गोवा महामार्गावर काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली होती, विशेषतः रायगड माणगाव मध्येच वाहतुकीचा खोळंबा झाला होता, दहा तासापेक्षा अधिक वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केला. रत्नागिरी जिल्ह्यात खवटी येथे झालेल्या भूस्खलनामध्ये जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन काही तासातच मार्ग मोकळा करून दिला, त्यामुळे जास्त काळ खवटी येथे वाहतूक थांबली नाही.

टाइम्स स्पेशल

आता मात्र गणेश भक्तांचा मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास सुसाट होणार आहे, सकाळी मुंबईच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दुपारी जेवायला आपल्या गावच्या मूळ घरात... असे घडणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माणगाव मधील अडथळा दूर करण्याच्या बाबत प्रशासकीय यंत्रणांना व ठेकेदारांना आदेश दिल्याने असे म्हणता येईल की आता गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुसाट होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg