loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - आमदार दीपक केसरकर सरळ साधा माणूस आणि सर्वांचं चांगलं व्हावं अशा विचाराने काम करत असतात अशी ओळख आहे. दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशा विचाराने काम करत असताना जनकल्याण करत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून सर्वांगीण चौफेर विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे असे विधान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. आमदार दीपक केसरकर यांच्या परोपकारी वृत्तीमुळे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यांची दूरदृष्टी मला जवळून पाहता आली हे माझे भाग्य समजतो. त्यांना पुन्हा जनकल्याणासाठी मंत्रीपद दिलं जावं अशी सदिच्छा संजू परब यांनी व्यक्त केली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनेकांनी रक्तदान करत शिबीरात सहभाग घेतला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे, प्राची राणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, दीपक केसरकर हे सरळ, साधे, कोणाचं वाईट न चिंतणार व्यक्तीमत्व आहे‌. या मतदारसंघासाठी केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी कधी घेतलं नाही. त्यांच्यासारखा आमदार या मतदारसंघाला मिळण कठीण असून त्यांना मंत्रीपद मिळावं अशा शुभेच्छा दिल्या. तसेच माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर, बासीत पडवेकर, युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, विनोद सावंत, ॲड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ, मेहर पडते आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg