loader
Breaking News
Breaking News
Foto

प्राथमिक आरोग्य केंद्र, वहाळ जन आरोग्य समितीवर तोंडली गावचे रहिवासी प्रभाकर सावंत यांची सदस्यपदी नियुक्ती

चिपळूण, (प्रतिनिधी) : ता. चिपळूण येथील तोंडली गावचे रहिवासी प्रभाकर धोंडू सावंत यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, वहाळ (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील जन आरोग्य समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा परिषद सदस्या तथा जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा शिवानीताई संदीप सावंत यांच्या शिफारशीनुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण तथा जन आरोग्य समितीच्या सचिव डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजकार्यातील सक्रिय सहभाग, जनहिताची बांधिलकी आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीतून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी ते कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रभाकर धोंडू सावंत यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg