बांदा(प्रतिनिधी)- ‘‘भावी जीवनात विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपले कौशल्य विकसित करून उद्योजक बना आणि इतरांना नोकर्या तयार करून देण्याचे स्वप्न बघा’’, असे प्रतिपादन बांदा केंद्रप्रमुख ‘अमित पाटील’ यांनी ‘व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल’, बांदा मध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक दिवाकर मावळणकर, बांदा क्रेंद्रप्रमुख अमित पाटील, उद्योजक शंकर उर्फ भाऊ वळंजू, नारायण पित्रे, मुख्याध्यापिका मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
अमित पाटील पुढे म्हणाले, देवाने तुमच्यामध्ये काहीना काही तरी असे सुप्त कौशल्य दिलेले आहे. हे कौशल्य ओळखून ते विकसित केले पाहिजे. बदलत्या काळाची गरज ओळखून आपले कौशल्य पणाला लावून आपले नाव एखाद्या व्यवसायातून मोठे अनेक उद्योजकांनी केले आहे. त्यांचे नाव तुम्ही तुमच्या समोर ठेवा. तुम्ही सुद्धा भविष्यात तुमच्या मधील कौशल्य पणाला लावून तुमचे नाव मोठं करू शकला असते मत व्यक्त केले. मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य म्हणजे नेमके काय असते तसेच आपलं कौशल्यांने आपण कसं आपल्या जीवनात त्याचा उपयोग करू शकतो याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले.
कौशल्य दिनानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात आले यामध्ये सकाळी इयत्ता आठवी, नववी, दहावी मधील विद्यार्थ्यांनी शाळेपासून बांदेश्वर मंदिर पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना घोषवाक्य दिली. इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, शिक्षक, शेतकरी, सादर केल्या. पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक भूषण सावंत, सुत्रसंचलन समन्वयक राकेश परब तर आभार नववी मधील विद्यार्थींनी सौम्य माजगावकर हीने मानले. यावेळी निदेशिका रिया देसाई उपस्थित होत्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.