loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे बायपास रस्त्यावर आयशर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

दापोली, (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील आंजर्लेकडे जाणार्या हर्णे बायपास रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी आयशर टेम्पो चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णे बायपास रस्त्यावर हॉटेल रेझींटाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आयशर टेम्पो (एमएच.०८.डब्ल्यू.९०१३) आणि सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी (एमएच. ०८. एव्ही. ४७१४) यांच्यात समोरासमोर धडक झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात दुचाकीस्वार बासीद अली दस्तगर बरमारे (वय ३२, रा. आडे वरचा मोहल्ला, ता. दापोली) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अडखळच्या पोलीस पाटील अवनी अनंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक गंगाराम रामू माने (रा. नवानगर, ता. दापोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg