loader
Breaking News
Breaking News
Foto

मंथन राज्यस्तरीय परीक्षेत कांबळेवाडी शाळेची अव्वल कामगिरी

मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिके कांबळेवाडी नं.3 शाळेने अव्वल कामगिरी बजावली आहे. मार्गदर्शक शिक्षक शितलकुमार आकुर्डे व पालक यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आहेत. मातोश्री कमलबाई विसपुते शाळेमध्ये पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात शाळेच्या संचालिका नंदा शेलार, प्रमुख अतिथी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या प्राध्यापिका व लेखिका निधी पटवर्धन, आगार व्यवस्थापक जाधव यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या परीक्षेत इयत्ता चौथी मधील मिहीर महेंद्र सांडीम तालुक्यात पहिला, आयुष रवींद्र ठिक तालुक्यात चौथा, वेद शंकर कांबळे तालुक्यात सहावा, इयत्ता दुसरी मधील आरुष मनोहर गोविलकर तालुक्यात पहिला, श्लोक शरद गोविलकर तालुक्यात दुसरा, शिव प्रमोद शिनगारे तालुक्यात सहावा, इयत्ता पहिली मधील स्मित महेश गोविलकर तालुक्यात पाचवा, राही नितीन सांडीम तालुक्यात तिसरा, ओवी फुटक तालुक्यात सहावा या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावलेला आहे.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र शिनगारे, टिके सरपंच भिकाजी शिनगारे, केंद्रप्रमुख मीनल कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक, पालक आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शितलकुमार आकुर्डे यांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg