loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण दरडग्रस्त भागात बीएसएनएलची सेवा ठप्पच, खेड तालुका ठाकरे सेनेने बीएसएनएलवर दिली धडक

खेड (प्रतिनिधी) - धवडे, किंजळे, वडगाव, बिरमणी, कळमणी, कांदोशी आणि आजूबाजूच्या भागात असलेली बीएसएनएलची सेवा मागील १५-२० दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असल्याने या सर्व भागातील लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. दहिवली शेलारवाडी दुर्घटना ताजी असतानाच अशाप्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास अथवा इतर कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास संपर्कावीना या भागातील लोकांनी मदतीसाठी संबधीत यंत्रणांकडे किंवा नातेवाईक, इतरांकडे मदत कशी मागणार याचा जाब विचारत तशी कोणतीही दुर्घटना अथवा आपत्तीजनक घटना घडल्यास आणि संपर्कावीना मदत न मिळाल्यास होणाऱ्या सर्व नुकसानीला बीएसएनएललाही जबाबदार धरले जाईल, असे तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी ठणकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच या भागातील गोरगरीब, शेतकरी लोकांचे रिचार्जपोटी झालेल्या रक्कमेची आर्थिक भरपाई किंवा सेवेमध्ये मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली. सदर ठप्प झालेली सेवा त्वरीत सुरू न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बीएसएनएल च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे सांगणेत आले. यावेळी तालुकाप्रमुख सचिन निकम यांचेसोबत त्या भागातील किरण मोरे, सहदेव जाधव, प्रविण जाधव, वसंत जाधव, राकेश कदम, विकास जाधव, महिपत जाधव, तुळशीराम जाधव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg