रत्नागिरी टाइम्स डेस्क : कोंकणात पावसाने आता विश्रांती घेतल्याने भात लावणीच्या कामाला ग्रामीण भागात वेग आला आहे ,खलाट पट्ट्यात भात शेतीचे मळे शेतकऱ्यांच्या भल्लरीने गजबजून गेले आहेत. आषाढी एकादशी पूर्वी भात शेती लावणी आटोपण्याचे उद्दिष्ट दरवर्षी शेतकऱ्यांचे असते, यंदा पाऊस जोरदार पडला मात्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकाम बंद करावे लागले होते. आता भात शेती लागवडीचे काम शेतकऱ्यांनी जोरदार सुरू केले असून ग्रामीण भागातील मळे भल्लरीने गजबजून गेले आहेत. एकमेकांना होकारांचे आवाज ऐकू येत आहेत. ठिकठिकाणी वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि त्याचे संगीत सोबतच भल्लरीचा आवाज येत आहे.
यंदा पाऊस लांबल्याने काही शेतकऱ्यांचे पेरे उशिरा झाले मात्र मृग नक्षत्रात झालेल्या पेऱ्यांना पाऊस पडल्यानंतर जोर आला त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होत असून दाढ लावणी योग्य झाली आहे. यंदा काही शेतकऱ्यांना मूठ उदार घ्यावी लागणार आहेत कारण पेरलेला पेरा चांगला रुजून आलेला दिसत नाही. ग्रामीण भागात दाढ विकत घेण्याची किंवा उदार घेण्याची पारंपारिक पद्धत आहे, आपण केलेल्या पेऱ्यातून शेजाऱ्याला गरज लागली तर मदत करण्याची भूमिका कोकणातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येते. वलाटपट्ट्यात कातळ भाग असल्याने नाचणे रोवणे कामाला दिरंगाई होणार आहे कारण अजून पेरा रुजलेला नाही, अतिवृष्टीचा तडाका कातळ भागातील शेतकऱ्यांना झेलावा लागणार आहे.
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी भात नाचणी वरी लागवडीचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेतकरी राजा राणी शेतात दिसून येत आहे , कोकणात भात लागवडीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे, ग्रामीण भागात महिलावर्ग भात लागवडीमध्ये पुढे असतो, चाकरमानी मुंबईला आणि गावी असलेल्या पत्नीने आईने भावाने भात लागवडीचे काम पूर्ण करायचे त्यासाठी चाकरमानी अगोदरच पैशाची बेगमी करतात. काही चाकरमानी भात लागवडीसाठी ग्रामीण भागात आलेले आहेत. कोकणात लागवडीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आता भात लागवड एकदा संपली की कोकणच्या दर्या खोऱ्यामध्ये ढोलकी वर थाप पडणार.... त्याची चाहूल आतापासून शहरात ढोलकी भरणाऱ्या कलाकारांच्या कडे दिसून येते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.