दापोली (चंद्रशेखर जोशी) : राज्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळावर डॉ. सुभाष अनंत चव्हाण आणि दत्ताराम माया वाघे या दोन नवीन संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेच्या दोन संचालकांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी या दोन संचालकांची निवड आज करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दापोली तथा अध्यासी अधिकारी अनिता बटवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज 20 जुलै २०२६ रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
निवडणूक कार्यक्रमानुसार सकाळी १२ वाजता प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी १२ ते १ या वेळेत उमेदवारीसाठी नामनिर्देशन पत्र वाटप आणि स्वीकृती करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ ते १:३० या वेळेत अर्जांची छाननी पार पडून १:३५ वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर १:३५ ते २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत देण्यात आली होती. मुदतीअखेर डॉ. सुभाष अनंत चव्हाण आणि दत्ताराम माया वाघे यांचेच अर्ज वैध ठरल्याने दुपारी २ वाजता अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करत अध्यासी अधिकाऱ्यांनी निवडणूक निकाल घोषित केला आणि दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या विशेष सभेस बँकेचे अध्यक्ष जयवंत शंकर जालगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय लक्ष्मण बिवलकर, संचालक माधव रामचंद्र शेट्ये, प्रभाकर पांडूरंग शिंदे, संदीप रमाकांत दिवेकर, विनोद रघुनाथ आवळे, आशिष चंद्रकांत मेहता, प्रमोद गोविंद काटकर, अशोक तुळशीराम जाधव, निलेश जयवंत जालगांवकर, ऋषिकेश नंदकिशोर भागवत आणि संचालिका मेधा सुर्यकांत केळकर उपस्थित होत्या. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले असून नवीन संचालकांच्या समावेशामुळे बँकेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.