loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवस वीजेचा लपंडाव, नागरिक अक्षरशः हैराण

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण कंपनीचा बोगस कारभार चव्हाट्यावर आला आहे. तीन दिवस वीजेचा लपंडाव सुरू असून घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बिघाड होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमधून बोलले जात आहे. गेले पाच दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना त्यामध्ये वीज वितरण कंपनीचाही त्रास सुरू आहे. तालुक्यात गेली तीन दिवस वीजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये या अनियमीत वीजेमुळे बिघड होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यावर तात्काळ उपाययोजना करून वीजेचा लपंडाव थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात वीज नसल्याने नागरी त्रस्त झाले आहेत. तर शहरासह ग्रामीण भागात वीजेचा दिवस-रात्र लपंडाव सुरू आहे. या वीजेच्या लपंडामुळे घरातील टीव्ही, फ्रिज इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधात नाराजी दिसून येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg