loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणच्या लोककलेतील जाखडी नृत्याची समृद्ध परंपरा आजही जोपासत आहे - शाहीर बळीराम पवार.

वरवेली (वार्ताहर) - कोकणातील बहुप्रसिद्ध लोककलामध्ये जाखडी नृत्यकला असून जाखडीच्या गीत गायनातून आध्यात्म्याबरोबरच समाज प्रबोधन केले जात आहे. लोककलेतील जाखडी नृत्याची समृद्ध परंपरा मी आजही जोपासत असल्याचे वरवेली तेलीवाडी येथील सुप्रसिद्ध शक्ती वाले शाहीर बळीराम काशिराम पवार यांनी सांगितले. वरवेली तेलीवाडी येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये सोमवारी जाखडी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले की, कोकणची लोककला आणि जाखडी नृत्याची समृद्ध परंपरा सर्व शाहीरानी जिवंत ठेवली आहे. सुमधुर आवाजात गण गवळण सादर करून केवल श्रुत यांचे मनोरंजन केले नाही तर कोकणचे सांस्कृतिक ओळख पर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य आम्ही करत आहोत, आपली हीच कला अशीच पुढे भरू दे आणि आपल्या जाखडीचा लोकप्रिय ठेका सदैव घुमत राहो.. जाखडी नृत्यकलेतील गण, गवळण व इतर गीतांच्या माध्यमातून जाखडी लोककला आम्ही ज्येष्ठ शाहीरानी जपून ठेवली असून नवोदित शाहिरांनी सुद्धा अशीच जपावी असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

जाखडी नृत्यकलेतील बुवा (शाहीर) बळीराम पवार यांना लहानपणापासूनच जाखडी नृत्याची आवड आहे. वरवेली गावातील मंदिरे तसेच विशेष करून गौरी गणपती तसेच श्रीकृष्ण जयंती या दिवशी त्यांचे जाखडी नृत्याचे कार्यक्रम होत असतात. जाखडीमध्ये विविध पारंपारिक गीते सादर करून सर्व श्रोत्यांचे ते मने जिंकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg