loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण प्रांतांचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

रत्नागिरी- चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे हे अतिवृष्टीमध्ये चांगले काम करीत आहेत. त्यांच्याप्रमाणे अन्य प्रांताधिकाऱ्यांनीही कार्यशैली राबवावी, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी त्यांचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण येथील वनविभागाच्या सभागृहात आज पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अतिवृष्टीमधील चिपळूणच्या खबरदारीविषयी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी श्री. लिगाडे यांनी यावेळी दिली. १५ मिनीटाला पाण्याच्या पातळीबाबत नागरिकांना अलर्ट मिळतो, अशी माहिती उपस्थित नागरिकांमधून देण्यात आली. त्यांच्या या कार्यशैलीबद्दल कौतुक करत जिल्ह्यातील अन्य प्रांताधिकाऱ्यांनी अशी कार्यशैली आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरावी, असे पालकमंत्री म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg