loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जाहीर नागरी सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर यांचे संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व पालक यांचा जाहीर नागरी सत्कार रविवार दिनांक १९ जुलै रोजी सायंकाळी ४ वा.डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह ज्ञानरश्मि वाचनालय, गुहागर येथे आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सत्कारमूर्तींमध्ये ज्येष्ठ कवी राजेंद्र सिताराम आरेकर (पाठयपुस्तकात कवितेचा समावेश), गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुधाकर शामराव कांबळे (शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम), केंद्रप्रमुख डॉ.मनोज नरसी पाटील (मराठी भाषा पाठ्यपुस्तक समितीवर निवड), प्राची कारेकर पाठ्यपुस्तकातील (विविध पाठांसाठी ४३ चित्रांची निवड) आणि शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व पालक गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता दीपा मिलिंद सावंत (जेष्ठ अधिव्याख्याता रत्नागिरी डायट) मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष नीता मालप, गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक, कर्मचारी वर्ग, सभासद, सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय, गुहागर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह व सर्व सभासद म.सा.प. शाखा गुहागर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg