loader
Breaking News
Breaking News
Foto

स्मार्ट शेतीकडे एक पाऊल वणोशी तर्फ पंचनदीत शेतकऱ्यांना 'महाविस्तार AI' चे तंत्रज्ञान'

दापोली (सागर गोवळे) - ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत, दापोली तालुक्यातील वणोशी तर्फ पंचनदी येथे 'कृषी सखी' गटाच्या पुढाकाराने आधुनिक शेती तंत्रज्ञानावर आधारित 'महाविस्तार AI' अ‍ॅपचे यशस्वी प्रात्यक्षिक पार पडले. या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीकडे एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. आजच्या माहितीच्या युगात शेती करताना अचूक आणि वेळेवर माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन 'कृषी सखी' गटातील विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मोबाईल तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रात्यक्षिकादरम्यान पायल मोरे यांनी शेतकऱ्यांच्या स्मार्टफोनमध्ये 'महाविस्तार AI' अ‍ॅप डाऊनलोड करणे, नोंदणी करणे आणि अ‍ॅपमधील विविध सेवा कशा वापराव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. हे अ‍ॅप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मार्गदर्शक ठरणार असून, यात खालील सुविधा उपलब्ध आहेत: पीक सल्ला: पिकांच्या वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन. ​हवामान अंदाज: स्थानिक हवामानाचा अचूक अंदाज मिळाल्याने नियोजनात सुलभता. रोग व कीड व्यवस्थापन: पिकांवरील रोगांची ओळख आणि त्यावर उपाययोजना. ​बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ताज्या बाजारभावाची माहिती. ​कार्यक्रमाच्या शेवटी संजना सदानंद जंगले यांनी आधुनिक शेती व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून उत्पादकता कशी वाढवता येईल, यावर सविस्तर प्रकाश टाकला.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमात वणोशी तर्फ पंचनदी येथील १२ हून अधिक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. डिजिटल साधनांच्या वापरामुळे शेतीतील कष्टाचे नियोजन करणे सुलभ होईल आणि उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 'कृषी सखी' गटातील संजना जंगले, पायल मोरे, मधुजा घडशी, शबरी चव्हाण, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज या विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg