loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील अंतर्गत सर्विस रोडची बिकट अवस्था, रस्त्यावर गाडी चालविणे तारेवरची कसरत

लांजा (वार्ताहर) - लांजा शहरातील सर्विस रोडची सध्या बिकट अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहने चालविताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून शहरातीलच हे सर्विस रोड आहेत की एखाद्या गावातील नादुरुस्त रस्ते? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. लांजा शहरातून जाणार्‍या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील सर्विस रोडची कामे अनेकदा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र सध्या पडणार्‍या पावसामुळे या सर्विस रोडची अवस्था फार बिकट बनली आहे. लांजा उपशेट्येवाडी ते लांजा एस.टी. डेपोपर्यंतच्या दरम्यान या सर्विस रोडची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून दुचाकी, तीनचाकी व अन्य वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टाईम्स स्पेशल

शहरातील सर्विस रोड तयार करताना ते किती दर्जात्मक बनविले जात आहेत याचा उत्कृष्ट नमुना सध्या लांजा शहरातील सर्विस रोडच्या कामावरून दिसून येत आहे. या रोडवरून चालताना पादचार्‍यांची अवस्था तर फार बिकट होत आहे. रस्त्याने चालताना पादचार्‍यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. कोणते वाहन कधी येईल आणि अंगावर चिखल उडवून जाईल हे सांगता येत नाही. एकूणच सध्या सर्विस रोडची झालेली दुरावस्था पाहता खेडेगावातला एखादा रस्ता बरा, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg