loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलचे 9 विद्यार्थी सी. ए. फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण

खेड (प्रतिनिधी) - माहे जूनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या 9 विद्यार्थ्यांनी सी. ए. फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. सी. ए. कोर्सच्या प्रवेश परीक्षेसाठी सी. ए. फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेकरिता संपूर्ण देशभरातून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रविष्ट होत असतात. यामध्ये रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील चिराग ओडोल, श्रावणी आवटी, हित जोयसर, मानसी कापसे, स्वराज मुरुडकर, तन्वी कानडे, श्वेता लांजेकर, अमिरा चौगुले, उल्फत मुकादम या विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीचातुर्याच्या बळावर सी. ए. फाउंडेशन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व विद्यार्थ्यांची रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच सी.ए.फाउंडेशनची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्यांना वाणिज्य विभागातील प्रा. रुपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. स्वप्निल पंडित, प्रा. अक्सा फोपळोणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सी. ए. फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg