loader
Breaking News
Breaking News
Foto

१९ जुलै रोजी शिक्षक समिती खेड आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा

खेड - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे सकाळी ९.३० ते २.०० या वेळेत संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुणगौरव सोहळ्यामध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण शिक्षक पाल्य, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, नवोदय परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, जेईई नीट बीडीएस एमटीएस इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थी, डॉक्टर इंजिनियर, वकील, पदवीधर, पदव्युत्तर व उच्च शिक्षण पूर्ण केलेले शिक्षक पाल्य, कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात राज्यस्तरीय कामगिरी करणारे विद्यार्थी, निवृत्त शिक्षक, नूतन केंद्रप्रमुख, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, शैक्षणिक अर्हता वाढवणारे शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा यथोचित सन्मान होणार आहे.

टाईम्स स्पेशल

तरी सर्व संबंधितांनी आपली नाव नोंदणी शैलेश पराडकर, श्रीकृष्ण खांडेकर, नितीन साळुंखे, निलेश कांदेकर, रविकिरण फुंदे, संतोष बर्वे, दिनेश पवार व धोंडूराम मिसाळ यांच्याकडे करावी. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी व गुणवंत विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर व दिलीप यादव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg