loader
Breaking News
Breaking News
Foto

खालापूर पंचायत समितीच्या वतीने टीबी मुक्त ग्राम पंचायत यांचा सन्मान

चौक, (अर्जुन कदम) खालापूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती यांच्या वतीने टीबी मुक्त ग्राम पंचायत यांचा सभापती कृष्णा पारंगे, उप सभापती भाई शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन २०२५ च्या "टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या "टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान" अंतर्गत खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीने क्षयरोग निर्मूलनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सन २०२५ करिता खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्षयरोगमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ज्या ज्या ग्रामपंचायतीने सातत्यपूर्ण केलेल्या कार्याचा गौरव करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे, असे सभापती कृष्णा पारंगे यांनी सांगितले. खोकताना कफा तून रक्त पडणे,संध्याकाळच्या वेळी हलका ताप येणे,अचानक वजन कमी होणे आणि खूप थकवा जाणवणे,रात्रीच्या वेळी जास्त घाम येणे ही टीबी ची कारणे आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये टीबीचे निदान आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत दिले जातात, असे प्रास्ताविक मध्ये डॉ.कल्याणी इंगोले तालुका आरोग्य अधिकारी (गट अ) यांनी सांगितले. कार्यक्रमास उपसभापती भाई शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे, पंचायत समिती सदस्य, टीबी मुक्त ग्राम पंचायत सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी, आरोग्य अधिकारी,कर्मचारी, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg