गुणदे- सरस्वती शिक्षण संस्था गुणदेच्या सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा व मंथन या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. सन २०२५-२०२६ मध्ये शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पंकजा पंडीत नागरगोजे व सोहम कृष्णा साळवी यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून शासनाकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनमान्य मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत प्रशालेतील इयत्ता ६ वी मधील मानस निलेश टेरवकर, आर्यन दीपक जाधव, दिशांक दिलीप कुळ्ये असे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले. सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. दत्ताजीराव गोविंद आंब्रे यांच्या पत्नी स्व. मातोश्री अनुसया (माई) आंब्रे यांचे आज १० वे पुण्यस्मरण असल्याने प्रशालेत स्व. माईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश पूजन, श्री सरस्वती पूजन व गुरुपूजन करण्यात आले. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रांत दत्ताजीराव आंब्रे, संस्था सहसचिव व शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र आंब्रे, संचालक संजय आंब्रे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कारित करण्यात आले.
यावेळी जगन्नाथ आंब्रे, शिवाजी सावंत, सदानंद आंब्रे, उमा आंब्रे, अमृता महामुणकर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी जोशी, गुरुकुलच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनिता विचारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सहसचिव व इतर सहकारी संचालक यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद यांचे अभिनंदन व कौतुक केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.