loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटी कामगाराच्या जीवाशी खेळ, चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाची मागणी

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील भोस्ते-निळीक परिसरात महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एका कंत्राटी कामगाराच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुकाध्यक्ष विनायक वामन निकम यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनानुसार, भोस्ते निळीक येथे कार्यरत असलेल्या महावितरणच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्याने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरू असतानाच कंत्राटी कामगार दिनेश माने यांना विद्युत खांबावर चढून काम, करण्याचे निर्देश दिले. नियमानुसार वीजपुरवठा बंद केल्यानंतरच अशा प्रकारचे काम करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार खांबावर चढल्यानंतर विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला आणि ते खांबावरून खाली पडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला अनेक वर्षाचा अनुभव असूनही निष्काळजीपणा केल्याने कंत्राटी कामगाराच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

या घटनेस संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे नमूद करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात अशा घटनांमध्ये एखाद्या कंत्राटी कामगाराचा जीव जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुकाध्यक्ष विनायक निकम, शहराध्यक्ष मंगेश भागवत, शिरीष पाटणे आणि सुभाष पालकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg