लांजा (संजय साळवी) - लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेले आठ दिवस सतत सुरू असलेला विजेचा लपंडाव आणि त्यामुळे लोकांचे होणारे नुकसान आणि गैरसोय यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी सोमवारी ६ जुलै रोजी दुपारी लांजा येथील महावितरणच्या कार्यालयावर जोरदार धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेले आठ दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. विजेच्या या सततच्या लपंडावामुळे तालुक्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. लांजा शहरात तर सततच्या वीज येण्याजाण्यामुळे नागरिकांची गैरसोय तर होत आहेच शिवाय व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये महावितरणच्या या गलथान कारभारा विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात तर विजेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. गेल्याआठ दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात वीज गायब झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांमध्ये महावितरणच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेले आठ दिवस ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने गावागावातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने लोकांचे भर पावसाळ्यात पाण्याचून हाल होत आहेत. त्याचबरोबर वीज गायब होण्याचा फटका हा ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि छोट्या-छोट्या व्यावसायिकांना देखील बसत असल्याने महावितरणच्या विरोधात ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा येथील महावितरणच्या कार्यालयावर जोरदार धडक मारली. उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी लांजा येथील महावितरणचे उपअभियंता संतोष चव्हाण यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. यावेळी उपअभियंता संतोष चव्हाण यांनी पुढील १५ दिवसांत लांजा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा अखंडितपणे पूर्ववत होईल अशी ग्वाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, पुढील १५ दिवसांत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास लांजा येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा गर्भित इशारा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी यावेळी बोलताना दिला. याप्रसंगी तालुकाप्रमुख युवराज हांदे, युवासेना तालुका अधिकारी, अभिजित राजेशिर्के, शहरप्रमुख मोहन तोडकरी, उप शहरप्रमुख प्रकाश गुरव, गवाणे उपविभागप्रमुख राजू सुर्वे, पुनस सरपंच संतोष लिंगायत, रिंगणे सरपंच संजय आयरे, उपसरपंच पांडुरंग पेडणेकर, पुनस उपसरपंच प्रमोद गुरव, उपसरपंच विघ्नेश गुरव, बाबा धावणे, भाई कामत, प्रकाश पांचाळ, निकेश कडू, घनश्याम कडू, सिद्धेश गुरव, किशोर कांबळे, दिनेश गुरव, गोपीनाथ गुरव, राजा कामत, अमोल पांचाळ, धर्मेंद्र पालये, महेश कांबळे, बबन दळवी यांच्यासह अन्य शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.