रत्नागिरी - रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका व देवरूख नगरपंचायत, तसेच देवरूख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये तीन दिवसीय जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अस्मी साळुंखे हिने आपल्या अप्रतिम कौशल्याच्या जोरावर सुवर्ण कामगिरीची नोंद केली. संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखत तिने तब्बल ५ सुवर्ण आणि १ कांस्य, अशी एकूण ६ पदके आपल्या नावावर जमा केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिला “बेस्ट परफॉर्मर” हा मानाचा किताबही प्रदान करण्यात आला. तसेच तिची राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये अस्मीने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखत यश संपादन केले आणि सुवर्ण कामगिरी केली. अस्मी ही रत्नागिरी येथील युवा मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरची खेळाडू असून तिच्या यशामध्ये मुख्य प्रशिक्षक राम कररा, शशिरेखा कररा, गुरुप्रसाद सावंत, सई सुवारे, अमेय पाटील, तसेच तिचे आई-वडील तन्वी साळुंखे व तुषार साळुंखे यांचा मोलाचा वाटा आहे. अस्मी साळुंखे ही पोडार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथील विद्यार्थिनी असून ती इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. अस्मीने गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत कठोर सराव केला आहे. तिची खेळावरील निष्ठा आणि जिद्द तिच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेतही निश्चितच दिसून येईल, असा विश्वास तिच्या सर्व शुभेच्छुकांनी व्यक्त केला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.