loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंडई ते पंढरपूर पायी वारीचे बांदा व इन्सुलीत स्वागत

बांदा (प्रतिनिधी) - संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय कुंडई - गोवा च्या कुंडई ते पंढरपूर पायी वारीचे बांदा व इन्सुली येथे स्वागत करण्यात आले. या वारीचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. शनिवारी सायंकाळी शेकडो वारकरी विठू नामाचा गजर करत बांदा येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिरात आले. मंदिरातर्फे वारीचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनय स्वार आणि अंकिता स्वार या दांपत्याने नाथांच्या पालखीचे पुजन केले. मठाच्या प्रांगणात नामाच्या गजरात रिंगण झाले. त्यानंतर आरती करण्यात आली. अल्पोपहारानंतर बांदा येथील श्री विठ्ठल मंदिर दर्शन करून जय संतोषी माता मंगल कार्यालय, बांदा येथे रात्री वारीचा निवास व महाप्रसाद झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वारकरी मंडळींसाठी "म्हणे सोहिरा" हा संत सोहिरोबानाथांच्या अभंगांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये प्रसाद आंबिये, नंदु बांदेकर, राजन सावंत, ऋषिकेश सावंत, रविंद्र उर्फ बंड्या हरमलकर, आशुतोष भांगले यांनी नाथांचे अभंग सादर केले. सुशांत नाईक (हार्मोनियम) व अजित गवस (तबला), प्रविण नाईक (पखवाज) यांनी साथसंगत केली. निवेदन डॉ. भक्ती महाजन -आळवे यांनी केले. ध्वनीसंयोजन व चित्रण सुभाष शिरोडकर व प्रमोद कळंगुटकर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी वारीची निवासाची व्यवस्था करणाऱ्या संदेश पटेकर यांचा नाथवंशज तथा वारीचे सदस्य विवेक आंबिये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सकाळी वारी इन्सुली येथे मार्गस्थ झाली. संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर डोबाशेळ इन्सुली येथे वारीचे स्वागत करण्यात आले. भजन, हरिपाठ, आरती करून महाप्रसाद घेऊन वारी दाणोलीकडे मार्गस्थ झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg