loader
Breaking News
Breaking News
Foto

पांगारी तर्फे हवेली मुख्य रस्ता खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीलाही बसू लागला आहे. पांगारी तर्फे हवेलीकडे जाणारा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. संबंधित ठिकाणी आणखी रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg